कोरोनाचा सामना करण्यासाठी १००० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचं काम युद्धपातळीवर

मुंबई – येथील वांद्रे – कुर्ला संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १००० खाटांची क्षमता असलेल्या कोविड१९ रुग्णालयाच्या कामाला आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट दिली.

येत्या १५ दिवसांत मुंबई येथील बी.के.सी. येथे १००० खाटांचे सर्व वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्शनाखाली उभारण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी उपक्रमास आज स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट देत जोमाने व युद्धपातळीवर सुरू असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची पहाणी केली तसेच सर्व तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली.

ठाणे येथील ज्युपिटर हाॅस्पिटल व एमएमआरडीए यांच्या संयुक्त निदर्शनाखाली या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे.

याप्रसंगी परिवहन मंत्री ना.अनिल परब, शिवसेना सचिव ना.मिलिंद नार्वेकर, एमएमआरडीए आयुक्त आर.राजीव आदी मान्यवर उपस्थित होते.