
हिमाचे सुवर्णयश
१. पोझनान अॅथलेटिक्स ग्रांप्रि स्पर्धा, पोलंड – २ जुलै – २०० मीटर – २३.६५ सेकंद
२. कुत्नो अॅथलेटिक्स स्पर्धा, पोलंड – ७ जुलै – २०० मीटर – २३.९७ सेकंद
३. क्लादनो अॅथलेटिक्स स्पर्धा, चेक प्रजासत्ताक – १३ जुलै – २०० मीटर – २३.४३ सेकंद
४. टाबोर अॅथलेटिक्स स्पर्धा, चेक प्रजासत्ताक – १७ जुलै – २०० मीटर – २३.२५ सेकंद
भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने बुधवारी चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टाबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिचे हे पंधरा दिवसांच्या आतील चौथे सुवर्णपदक ठरले.
पहिल्या शर्यतीपासून तिने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. हिमाचा मुख्य प्रकार ४०० मीटरचा आहे. तिला अद्याप वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत २०० आणि ४०० मीटरसाठी पात्र ठरता आलेले नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याची वेळ २०० मीटरमध्ये २३.०२ सेकंद असून, ४०० मीटरसाठी ५१.८० सेकंद आहे.
हिमाने या स्पर्धेतील महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.२५ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. हिमाची प्रतिस्पर्धी व्ही. के. विस्मया हिने २३.४३ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले.











