
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 16 वर
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील डांबरे येथिल ४ रुग्ण ढालकाठी येथील २, मालवण हिवाळे येथील १ तर वैभववाडी नाधवडे येथे १ रुग्ण आहे अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता १६ वर पोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत त्यातील ५ रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत. तर ३ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे आता नव्याने ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध प्रशासन घेत आहे.






