
मुंबई – खात्री करुन घेतल्याशिवाय माहिती शेअर न करण्यासंदर्भात पोलिसांनी केलं आवाहन
मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता भाजपा नेते किरीट सोमय्या हे ट्विटरवरुन याचसंदर्भात वारंवार राज्यातील महाविकास आघाडीला प्रश्न करताना दिसत आहे.
शीवमधील रुग्णालयातील व्हिडिओ असो किंवा एखाद्या घटनेवरील प्रतिक्रिया असो सोमय्या हे ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात.
मात्र सोमय्या यांनी नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण थेट मुंबई पोलिसांनी दिलं आहे.
पोलिसांसंदर्भातील व्हिडिओ हा जुना असल्याचे थेट पोलिसांनी सांगितल्यानंतर सोमय्या यांनी ट्विट डिलीट केलं आहे.






