
85 अहवाल आले निगेटीव्ह
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 03 – जिल्ह्या सामान्य रुग्णालयास आज प्राप्त झालेल्या 87 कोरोना तपासणी अहवालांमध्ये 2 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 85 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉजिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये कुडाळ तालुक्यातील 1, वैभववाडी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबई येथून जिल्ह्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 89 झाली आहे.

जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील पुढील प्रमाणे कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण.
वैभववाडी तालुक्यात मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे हे कंटेनमेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळी टेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
कुडाळ तालुक्यातील कंटेनमेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी. मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात एकूण 24 हजार 921 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 579 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 23 हजार 17 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 325 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 138 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 89 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 938 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 108 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 120 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 67 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 8 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 7 हजार 351 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण 89 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 8 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 79 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 70 हजार 77 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
कोवीड – 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्वांना लागू केली आहे. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली व शिरोडा, संजिवणी हॉस्पिटल, सावंतवाडी, सुयश हॉस्पिटल, कुडाळ, लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे, नागवेकर हॉस्पिटल, कणकवली, गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली, संजिवनी हॉस्पिटल, कणकवली, साईलिला हॉस्पिटल, नाटळ, गोवा मेडिलक कॉलेज हॉस्पिटल, बांबोळी, गोवा अशा 12 रुग्णालयांना लागू आहे.






