
ऐक्याचं अनोखं दर्शन

दिल्ली: देशाच्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लाईट बंद करून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी घराबाहेर दिवा लावून एक जुटीच दर्शन घडव असे आवाहन केले होते आणि त्याला देशवासीयांनी दिवे, मेणबत्ती आणि मोबाईल फ्लॅश लाईट लावून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
देश भरात वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील दिवे, पणत्या लावून एक जुटीच्या या अनोख्या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, पुणे आदी विविध भागांत सर्वसामान्य जनतेने लाईट बंद करून दिवे लावले आणि देशाच्या पंतप्रधानांना साथ दिलेली पाहायला मिळाली. लहान थोरांपासून सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. भारत कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी देश एकजूट आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होता. बऱ्याच अंशी नरेन्द्र मोदी यांचा हा प्रकाश पर्व यशस्वी पाहायला मिळाली.







