
दर वर्षी विविध देशांमध्ये नेत्रदानाचे महत्व समजून 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो.
या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. जागतिक दृष्टी दिनाचे उध्दिष्टये नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.
विकासशील देशामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. आपल्या आयुष्यात डोळ्यांचे फार महत्व आहे. हे तर आपण सर्वानाच ठाऊक आहेत.
जगातील सर्व सुंदर वस्तू आणि सुंदर जगाचा आनंद आपल्या डोळ्यांमुळेच घेउ शकतो. डोळ्यांशिवाय राहण्याची कल्पना करणे अशक्यच आहे. डोळ्यांशिवाय सुंदर रंगांची कल्पना करणे देखील अशक्य आहेत.
सध्याचा काळात बदलणारी जीवनशैली, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि मानसिक ताण जास्त प्रमाणात वाढल्याने बहुतेक लोकांना डोळ्यांच्या त्रासाला सामोरा जावं लागतं. काही जणांना हा त्रास लहानग्या वाया पासूनच असतो तर काहींना वयाच्या मध्यकाळात होतो.
जगभरात दृष्टीहीन लोकांची संख्या जास्त आहे या मधील तर काही जण जन्मांध असतात. तर काही दुर्देवी जण रक्ताच्या कर्करोगामुळे आपल्या डोळ्यांच्या दृष्टी बरोबरच आपले प्राण देखील गमावतात.
डोळ्यांचे महत्व आपण सर्वाना माहित आहे म्हणूनच आपण याचे संरक्षण मोठ्या प्रमाणात करत असतो. पण आपल्यापैकी बरेच जण असतात जे आपल्या बरोबर दुसऱ्यांचा देखील विचार करतात. डोळे जे निव्वळ आपल्यालाच प्रकाश न देता दुसऱ्याच्या आयुष्यात देखील आपल्या मृत्यू पश्चात अंधार काढून टाकतात.
पण जेव्हा नेत्रादानाबद्दल बोलले जाते तर बरेच जण या अंधश्रद्धे पोटी माघारी घेतात की पुढच्या जन्मी देखील जन्म आंधळं तर होणार नाही न. त्यांचा या अंधश्रद्धेमुळे जगातील बऱ्याचश्या अंध व्यक्तींना आयुष्यात अंधारातच राहावे लागतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानी अंधत्व होण्याच्या मुख्य कारणांपैकी प्रमुख कारण आहे.
नेत्रदान कसं करावंनेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूच्या काही तासातच केली जाते आणि यापासून कोणत्याही प्रकाराचा त्रास होत नाही.
एका मरण पावलेल्या व्यक्तीचे डोळे एका आंधळ्या व्यक्तीला दिले जाते. जेणे करून त्या अंध व्यक्तीच्या आयुष्यात उजेड होऊ शकतो.
मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते.कुठलाही माणुस नेत्रदान करु शकतो. दात्याला वयाचं बंधन नाही, कुठल्याही वयाचा माणुस नेत्रदान करु शकतो. अशा दात्याची नोंदणी असणे आवश्यक असते. परंतु ज्या व्यक्तिंना एड्स, सिफलिस किंवा रक्ताचे इन्फेक्शन असेल किंवा मृत्यु रेबीजमुळे झाल्यास नेत्रदान करता येत नाही.नेत्रदान करण्यासाठी जवळच्या आय बॅंक मध्ये जाउन नोंदणी करणे आवश्यक असते.मृत्यूनंतर नेत्रपेढीस ताबडतोब कळवावे.
जर का आपण देखील एखाद्या आंधळ्याचा आयुष्यात उजेड पाडू इच्छित असल्यास आपल्या जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून नेत्रदानासाठी नोंदणी करू शकता.
एखाद्या आंधळ्याच्या आयुष्यात प्रकाश व्हावा यासाठी आपण देखील एक पाउल पुढे टाका.











