प्रगती फौंडेशनने पार पाडला गरजूंना मोफत अन्न धान्य वाटपाचा तिसरा टप्पा


राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे आणि त्यानंतर लॉक डाऊन यामुळे सामान्य जनतेचे कंबरडच मोडले. प्रगती फौंडेशनने मार्च महिन्यापासून सुरू केलेल्या गरजूंना धान्य वाटपाचा आज तिसरा टप्पा पार पडला. गरजूंना अन्न धान्य व आवश्यक किराणा सामुग्री वाटप करण्यात आले.

आज कुर्ला, चेंबूर आणि पनवेल येथील प्रत्येकी पंचवीस कुटुंबांना राशन वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने 5 किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचे पीठ, अर्धा किलो तुर डाळ, दोन किलो साखर आणि पाव किलो चहा पावडर इत्यादी वस्तूंचा समावेश होता. तसेच बेडशीट व टॉवेल वाटण्यात आले.

आजच्या टप्प्यातील लाभार्थ्यांचे सर्व फोटोज प्रसिध्द करण्यात येणार नाहीत कारण या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख जाहीर करू नये तसेच सोशल मीडिया वर पोस्ट करू नये, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीस मान देवून आज मदत करण्यात आलेल्या सर्वच लाभार्थ्यांचे फोटो प्रसिद्ध न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. फक्त मान्यता दिलेले फोटो प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. असे संस्थेचे अध्यक्ष किरण राणे यांनी सांगितले.