अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा न घेण्याचा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीर राज्य सरकारचा मोठा निर्णय

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं बिगर व्यावसायिक / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अंतिम वर्षाची /अंतिम सेमिस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्याचे वातावरण अद्याप कोणतीही परीक्षा किंवा वर्ग घेण्यास अनुकूल नसल्याने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची / अंतिम सेमेस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

विद्यापीठांनी ठरवलेल्या सूत्रानुसार अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.