
मनसेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
नवी मुंबईकरांसाठी कोविड टेस्टिंग लॅब तात्काळ सुरू करा. अन्यथा मनपा व पालकमंत्र्यांविरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण नवी मुंबई यांच्या वतीने देण्यात आला आहे.
नवी मुंबई क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने कालच पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील 44 विविध भागात सात दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला परंतु बऱ्याच दिवसांपासून अनेकांनी पाठपुरावा करूनही नवी मुंबईत अद्याप पर्यंत कोरोना टेस्टिंग लॅब नाही.
कोरिनाचं शिरकाव होवून जवळपास तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी सुद्धा नवी मुंबई सारख्या स्मार्ट सिटीत कोरोना टेस्टिंग लॅब नाही यामुळे रुग्णांना रिपोर्ट मिळण्यास सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. या दरम्यान रुग्णांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. हॉस्पिटल मध्ये रिपोर्ट नाही म्हणून सात ते आठ दिवस राहावे लागते आणि प्रायव्हेट हॉस्पिटल भरमसाठ बिल उकळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईत कोरोना टेस्टिंग लॅब हवी हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. यासंबधी गजानन काळे यांनी सतत पाठपुरावा करीत आहेत. प्रशासन याबाबत दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत अशी भावना जनमासात निर्माण झाली आहे.
नवी मुंबईत येत्या दहा दिवसांत कोरोना टेस्टिंग लॅब सुरू झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही तसेच मनपा प्रशासन व पालकमंत्री विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा स्वरूपाचे पत्रच ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना मनसे मार्फत देण्यात आले आहे.







