
भुवनेश्वर: टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारताने अखेर घरच्या मैदानावर शेवटच्या प्रयत्नात यश मिळवले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने रशियाचा दुसऱ्या सामन्यात 7-1 असा धुव्वा उडवून एकूण 11-3 अशा गोल फरकाच्या जोरावर एकवीसाव्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. महिला संघानेही एकूण 6-5 अशा गोल फरकानुसार अमेरिकेला धूळ चारत तिसऱ्यादा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.











