कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार, थेट भरती प्रक्रियेत सोशिल डीस्तन्स चा फज्जा

कल्याण – एकीकडे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायची तर दुसरीकडे महानगरपालिकेत भरतीसाठी कोणतेही नियोजन न करता प्रक्रिया राबवायची अशी सुपीक कल्पना कुणाच्या डोक्यात येते असा प्रश्न नागरिक व्यक्त करीत आहेत.

आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत वॉर्ड बॉय या पदासाठी थेट मुलाखती घेतल्या जात आहेत.या भरतीसाठी बेरोजगार तरुणांची प्रचंड प्रमाणात गर्दी जमली आहे

महानगरपालिकेच्या भरतीसाठी जमलेले तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरलेल्या महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

जर या हजारो बेरोजगार तरुणांना कोरोना विषाणूची लागण झाली तर याचे किती गंभीर परिणाम इतर नागरिकांना भोगावे लागतील याची पुसटशी कल्पना देखील प्रशासनाला नसावी याचे आश्चर्य वाटते.

एकीकडे कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा करायची तर दुसरीकडे अशी गर्दी जमवायची हे कोणत्या नियम व निकषात बसते याचे स्पष्टीकरण महानगरपालिका प्रशासनाने करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे