
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा 87 वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करिता “आरोग्य उत्सव” म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
“आरोग्य उत्सव” म्हणजे काय?
आपणा सर्वाना माहीत असेल की ज्यावेळी महाराष्ट्र राज्यात को रो ना पाश्र्वभूमीवर जनतेने काळजी घ्या असा मजकूर फलक मंडळाने लावला त्यावर चायना वॉर लिहीत पहिला निषेध मंडळाने नोंदविला.
रक्ताची तुटवडा जाणवू लागताच 1546 रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाने पुढाकार घेतला.
जनता क्लिनिक माध्यमातुन ambulance, डॉक्टर मदतीने जनता क्लिनिक दक्षिण मध्य मुंबईत राबविले मंडळाचे डायल सिस् सेवा देखील या काळात सुरू ठेवली.
आरोग्य उत्सव साजरा करीत असताना प्लाझ्मा थेरपी ला प्राधान्य देवून अधिका अधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प, गलथान खोर्यात शहीद झालेल्या जवानां च्या कुटुंबा प्रति योग्य मान सन्मान, तसेच को रो ना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार असे एक ना अनेक संकल्प राबवून सेवा करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
लालबाग चा राजा हे आमचे श्रद्धा स्थान दैवत आहे यात कोणतीही शंका असण्याचे कारन नाही पण त्याच्या स्थापना व विसर्जन या बाबीकडे जनता जनार्दन यांची आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मानस ठेवून जीव वाचवून त्यांच्या शरीरात व हृदयात लालबागचा राजा पाहण्याचे अभूतपूर्व स्वप्न असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.











