
महिला टी-20 चॅलेंजचा अंतिम (Women’s T20 Challenge Final) सामना सुपरनोव्हास (Supernovas) आणि ट्रेलब्लेझर (Trailblazers) यांच्यात नुकताच पार पडला.
ट्रेलब्लेझरने पहिले फलंदाजी करत 118 धावा केल्या ज्याच्या प्रत्युत्तरात हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) सुपरनोव्हासला 111 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ट्रेलब्लेझरने 16 धावांनी विजय मिळवला.
अशाप्रकारे शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) झालेल्या स्पर्धेत ट्रेलब्लेझर पहिल्यांदा स्पर्धेचे चॅम्पियन बनले.
हरमनप्रीतच्या संघाने यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद जिंकले होते. पण, ट्रेलब्लेझरने यंदा विजयाची हॅटट्रिक करण्याचे स्वप्न भंग झाले.
ट्रेलब्लेझरच्या विजेतेपदाच्या विजयात आज गोलंदाजांनी महतवाची भूमिका बजावली. छोट्या लक्ष्याचा बचाव करताना गोलंदाजांनी संघाला उपयुक्त सुरुवात करून दिली आणि सुपरनोव्हास फलंदाजांवर सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले.

ट्रेलब्लेझरसाठी सलमा खातूनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर दीप्ती शर्माने 2 तर आणि सोफी एक्लस्टोन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दुसरीकडे, सुपरनोव्हाससाठी कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक 30 धावा केल्या. शशिकला सिरीवर्डेन 19 धावा केल्या, तानिया भाटियाने 14 आणि जेमीमाह रॉड्रिग्जने 13 धावा केल्या











