
बिहार विधानसभा निवडणुकीचा तब्बल 18 तासानंतर संपूर्ण निकाल लागला आहे. या चुरशीच्या लढतीत एनडीए विजय झाला आहे. तर, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत एनडीएला 122 (भाजप- 72, जेडीयू- 42, व्हीआयपी- 4, एचएएम- 4) जागा मिळाल्या आहेत. तर, महागठबंधनला 110 ( आरजेडी-75, काँग्रेस-19, लेफ्ट- 16 ) जागा मिळाल्या आहेत.
बिहारच्या रणसंग्रामात नीतीश बाबूंच्या जेडीयू आणि तेजस्वी यादवांच्या राजदला मागे टाकत, भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलाय.
प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत बिहारी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपच्या पारड्यात आपलं झुकतं माप टाकलं आहे. बिहारच्या राजकारणात सद्यस्थितीत भाजप नंबर एकचा पक्ष बनलाय.











