“तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही” – नवाब मलिक

मुंबई | देशातल्या अनेक भागांमध्ये करोनाची दुसरी लाट आलीये. महाराष्ट्रात देखील जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दरम्यान कोरोनाच्या येणाऱ्या परिस्थितीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलंय. यावेळी त्यांनी सर्वांना नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, “महाराष्ट्रात जर सर्व नागरिकांनी या संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेतली शिवाय सरकारचे सर्व नियम पाळले तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउनची गरज भासणार नाही.”

तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरीक मार्गदर्शक तत्वाचं पालन करत नसल्याचा आरोप केला आहे.