
बुलडाणा:- महाविकास आघाडी सरकारला विजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि.२३ नोव्हेंबर२०२० रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यव्यापी विजबिल होळी आंदोलन छेडण्यात आले होते. बुलडान्यातही भाजपाच्या वतीने अधीक्षक अभियंता,महावितरण यांच्या कार्यालया समोर प्रदेश प्रतिनिधि मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विज बिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी तालुक्याच्या वतीने महावितरणला लेखी मागण्यांचे निवेदन सादर केले.लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ विजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वत: “यू टर्न ” घेत विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने विजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा विजबिलांच्या होळीचे आंदोलन करत आहे,असे मत तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी व्यक्त केले.
निवेदनात काही ठळक मागण्या नमूद आहे की,लॉकडाउन काळातिल विज बिले माफ करा,कृषि पंपाना सलग आठ तस विज दया,ऑइलचा मुबलक पुरवठा करा,नादुरुस्त ट्रांसफार्मर तत्त्काळ दुरुस्त करा,ट्रांसफार्मर साठी तीन हजार रूपयांची सक्तिची वसूली बंद करा ,ट्रांसफार्मर ला पूर्ण क्षमतेंने विज पुरवठा करा ई मागण्या निवेदनात नमूद आहे.
प्रदेश प्रतिनिधि मा.आमदार विजयराज शिंदे यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढ़त “लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक,रस्त्यावरील व्यावसायिक,बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वत:हून पॅकेज द्यायला हवे होते. परंतु आघाडी सरकारने अजूनही जनतेला व शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत दिली नाहीच उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ विजबिले हाती देऊन जनतेला आर्थिक संकटात टाकले आहे. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही.आघाडी सरकारने ग्राहकांची विज बिले माफ न केल्यास येणाऱ्या काळात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरु व कायदा हातात घेऊ असा इशारा मा. आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपच्या वतीने दिला आहे.
या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर,पं.स.सदस्य संदीप उगले, नगरसेवक उदय देशपांडे, अरविंद होंडे,मंदार बाहेकर,वैभव इंगळे,भाजयू मोर्च्या शहराध्यक्ष विनायक भाग्यवंत,मा.नगराध्यक्ष विट्ठलराव येवले,स्मिताताई चेकेटकर,महिला मोर्च्या बुलडाणा तालुका अध्यक्ष सौ.नंदिनी साळवे,सरपंच सौ.कांताताई राजगूरे,गौरव राठोड़,प्रभाकर वारे,दत्ता पाटिल,सखाराम नरोटे,मनीष पाटिल,डॉ.राजेश्वर उबरहंडे,ऍड.पराग वाघ,अर्जुन दांडगे,संजय जूंबड़,अंकुश भालेराव,आशीष व्यवहारे,नितिन बेंडवाल,दीपक पुराणे,भारत गव्हाने,विश्रामजी पवार,राजेंद्र पवार,अशोक उगले,दत्ता शेवाले,सागर जोशी,प्रदीप मांडवगड़े,केशव तरमले,अशोक किलबिले,कुलदीप पवार,आशीष दळवी,आशीष देशमुख,अमोल गायकवाड़ ,आकाश बोडखे, सागर जाधव,ई भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






