
सम्पूर्ण देशातील स्टेशन मास्टर 25 नोव्हेंबरला मंडळ कार्यालयासमोर धरणा प्रदर्शन करणार आहेत.
संपूर्ण भारतातील 35000 स्टेशन मास्टर खालील तिन मागण्यासाठी सात ऑक्टोबर पासून विरोध प्रदर्शन करत आहेत अशी माहिती धरमवीर सिंग अरोरा (जनरल सेक्रेटरी ,सेंट्रल रेल्वे) यांनी दिली आहे.
1) नाईट ड्युटी सीलिंग मर्यादा आदेश रद्द केला जावा.
2) ओपन लाइन स्टाफ साठी 50 लाख रुपयाचा विमा दिला जावा .
3) रेल्वे चे खाजगीकरण तथा कंत्राटीकरण बंद केले जावे
रेल्वे बोर्ड पत्र संख्या 83/2020 तारीख 29/9/2020 नाईट ड्युटी एलॉऊन्स सीलिंग चा विरोध तथा अन्य दोन मागण्यासाठी संपूर्ण भारतातील 35000 स्टेशन मास्टर 25/11/2020 ला सर्व मंडळ कार्यालया समोर पाचव्या चरणात विरोध प्रदर्शन करतील.
पहिल्या चरणात AISMA च्या पदाधिकारया द्वारें रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांना इ मेल पाठवून विरोध केला गेला .
दुसऱ्या चरणात संपूर्ण भारतातील स्टेशन मास्टरनी 15/10/2020 रात्री पाळी मध्ये मेणबत्ती पेटवून विरोध दर्शविला.
तिसऱ्या चरणात 20/10/2020 ते 26/10/2020 पर्यंत गणवेशावर काळी पट्टी लावून गाडी संचालन केले गेले .
चवथ्या चरणात 31/10/2020 ला उपोषण करून संपूर्ण भारतातील स्टेशन मास्टरनी विरोध प्रदर्शन केलें.
तरीही प्रशासनाने स्टेशन मास्टरच्या हिताचा निर्णय घेतला नाही व नोव्हेंबरमध्ये रात्री ड्युटी एलौन्स दिला नाही.
आता पाचव्या चरणात संपुर्ण भारतातील 35000 ऑन/ऑफ़ ड्युटी स्टेशन मास्टर सर्व मंडळ कार्यलया समोर धरणा धरणार आहेत.
जर का प्रशासनाने आपला निर्णय रद्द नाही केला तर सहाव्या चरणात अधिक तीव्र विरोध करण्याची पद्धत वापरली जाईल व त्याची सर्व जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल .






