
पनवेल : पनवेलमधील सुकापूर व देवद या दोन गावांमधील नदीमध्ये पावसाळ्या व्यतिरिक्त ये-जा करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. पावसाचे पाणी अचानक वाढल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने स्कॉर्पिओ गाडी नदीमध्ये अडकली.सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ग्रामस्थांनी पोकलेन आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही गाडी बाहेर खेचून काढण्यात आली.






