इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनो सावधान – कर्णधार नासिर हुसेन

इंग्लंडचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. मात्र, याआधीच इंग्लंडच्या माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी इंग्लंडच्या संघाला सावधानीचा इशारा दिला आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. घरच्या मैदानात त्यांची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. यामुळे या दौऱ्यावर भारतीय संघाला कमी लेखता येणार नाही, असेही हुसेन म्हणाले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघाने टी-20 आणि कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन केले आहे. आता भारताची पुढील कसोटी मालिका इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर असणार आहे.

दरम्यान, नासिर हुसेनने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नुकतीच कसोटी मालिका जिंकली आहे. या कसोटी मालिकेच्या सुरुवातील भारतीय संघ डगमगताना दिसला. तसेच पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताचा कर्धणार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. एवढेच नव्हेतर, भारतीय संघातील आघाडीचे गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर पडले. मात्र, असे असतानाही भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले आणि कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाला अजिबात कमी लेखून चालणार नाही. आणि त्यांच्यावर दबावही टाकता येणार नाही” असे नासिर हुसेन म्हणाले आहेत.