डोंबिवली परिसरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

दागिने व मोबाईल चोरांची टोळी सक्रिय

पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिसांकडून योग्य तो तपास नसल्याचा तक्रारदारांचा आरोप. तक्रारदारानाच पोलीस पाठवतात चोरांच्या मागावर. डोंबिवली पूर्व येथील माधवी बांगला परिसरातून १० मोबाईल चोरांनी लंपास केल्याचा नागरिकांचा आरोप. मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.कल्याणमध्ये राहणाऱ्या निकिता राऊत यांचा मोबाईल डोंबिवली परिसरात चोरट्याने लंपास केल्याने त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली