मुंबईच्या गोरेगाव येथील एका स्टुडिओला आग

मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव (Goregaon) परिसरातील एका स्टुडिओला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या (Fire Engines) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही