
सीबीएसई बोर्ड दहावी आणि बारावीच्या परीक्षेची डेट शीट (CBSE Board Exams 2021 Datesheet) जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बोर्डाच्या परीक्षेचे तारीख पत्रक प्रसिद्ध केले आहे. बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.
वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवार cbse.nic.in वेबसाइटवर डेटशीट तपासू शकतात आणि तपशील डेटशीट डाउनलोडदेखील करू शकतात, 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. 15 जुलैपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर होईल.











