
वैभववाडी (सिंधुदुर्ग) तालुक्यात सलग तीन दिवस मुसळधार कोसळणा-या पावसाने दाणादाण उडविली आहे. शनिवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात दरड कोसळली. यामुळे गगनबावडा-खारेपाटण राज्यमार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे.
शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली. या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.






