
लंडन: क्रिकेट वर्ल्ड कप पूर्व तयारी सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला आणि आपली ताकत दाखवून दिली. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करीत बाबर आलमच्या शतकाच्या जोरावर सर्वबाद 267 अशी धावसंख्या उभारली. अफगाणिस्तानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून 7 बाद 268 अशी मजल मारून तीन विकेटने सामना जिंकला. सराव सामना जरी असला तरी अफगाणिस्तानला यामुळे पुढील सामन्यासाठी मोठे बळ मिळेल. पाकिस्तान सलग बारावा एकदिवसीय सामना पराभूत झाला आहे त्यामुळे त्यांच्या साठी चिंता वाढली आहे.











