रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया रोजगार आघाडी नवीमुंबई च्या वतीने शिवजयंती निमीत्त रोजगार मेळाव्याचे आयोजन

कारोना संकट काळात अनेक जणांचे रोजगार गेले तसेच अनेक तरुण वर्ग बेरोजगार झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी नवी मुंबई मार्फत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया रोजगार आघाडी नवीमुंबई च्या वतीने शिवजयंती निम्मीत्त रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रिपाई रोजगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा जगताप यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

रोजगार मेळाव्यात शंभरहून अधिक उमेदवारांनी उपस्थिती लावली. आजच्या मेळाव्यात जवळपास वीस संस्था तथा कंपन्यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रातील चार संस्थांनी सहभाग घेतला होता.

सहभागी संस्थांमध्ये प्रामुख्याने बँकीग, इन्सुरन्श, फायनान्स, मार्केटिंग, सेल्स, बॅकऑफिस, हॉस्पिटॅलिटी, सुरक्षा रक्षक, इंजिनिअरिंग आणि अकाऊट क्षेत्रातील रोजगार उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच कोटक फांऊडेशन, एल अँन्ड टी फांऊडेशन, क्रिस्टल प्रा.लि., मरिन इंजिनियरिग. टाटा स्काय इत्यादी नामचीन संस्थांनी सहभागनोंदविलाहोता.

सदर रोजगार मेळाव्यात ऐंशीते नव्वद टक्के लोकाना अपाँइमेंट लेटर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. काही उमेदवाराना दुसऱ्या रांऊड साठी बोलवण्यात आले आहे.

यावेळी रिपाई रोजगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा जगताप, नवी मुंबई अध्यक्ष सिद्रामजी ओव्होळ, युवा नेते अँड. यशपाल ओव्होळ, वाशी शहर प्रमुख आयुब खान, नवी मुंबई युवक अध्यक्ष विजय कांबळे, रिपाई आयटी सेल सरचिटणीस सचिन कटारे उपस्थित होते.

तसेच सहयोगी संस्था प्रगती फांऊडेशन चे अध्यक्ष किरण राणे तसेच संस्थेचे पदाधिकारी राकेश वाणी उपस्थित होते.

रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी एच आर मँनेजमेंट च्या आश्विनी मँडम , रिपाई रोजगार आघाडीचे मल्लिकार्जुन कांबळे, नवी मुंबई रो.आ. अध्यक्ष संदेश उघडे, आश्विन कांबळे आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले. कोरोना संकटाच भान ठेवून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.