Airtel ची प्री पेड ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर

एअरटेल (Airtel) कंपनीने आपल्या युजर्ससाठी जबरदस्त प्लान आणला आहे. ज्यात ग्राहकांना 6GB चा मोफत डेटा मिळणार आहे. हा प्लान एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी (Prepaid Customer) आहे.

आपल्या प्रीपेड ग्राहकांना कंपनी 6GB डेटाचे (6GB Free Internet Data) कूपन देणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

  • या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे किमान 291 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज (Minimum Prepaid Recharge) करावा लागेल.
  •  एयरटेल 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 289 रुपये, 299 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये आणि 448 रुपयांच्या रिचार्जवर 1GB डेटाचे दोन कूपन देईल. हे फ्री डेटा कूपन 28 दिवसांसाठी वैध असेल.
  •  ग्राहकांना 1GB डेटाचे चार कूपन मिळवण्यासाठी 399 रुपये, 449 रुपये, 558 रुपये आणि 599 रुपयांच्या रिचार्जसह त्यांच्या प्रिपेड नंबरवर रिचार्ज करावा लागेल. हे कूपन 56 दिवसांसाठी वैध असतील.
  • 598 रुपये आणि 698 रुपयांच्या प्रिपेड रिचार्ज प्लॅनमध्ये (Prepaid recharge plan) प्रत्येकी 1GB (84 दिवसांसाठी वैध) चे एकूण 6 कूपन दिले जातील

ऑफरमध्ये काही ठराविक ग्राहकांना 6GB डेटा मोफत मिळणार आहे. मात्र ही ऑफर सिलेक्टेट युजर्ससाठीच असणार याची नोंद घ्यावी.