परभणी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 15 मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले.

कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याने गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरताना नागरिक सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणते आहे.

तसेच सॅनिटायझरचा वापर न करणे, तोंडावर मास्क न लावता संचार करित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात करोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबती निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 15 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवावेत, असे आदेश बजावले आहेत.