संजय दिना पाटील यांचाही सेनेत प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का

मुंबई: राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक वजनदार नेते संजय दिना पाटील यांनी आज मातोश्री वर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना शिवसेनेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहिन. तसेच एका नवीन विचारधारेत आपण प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया संजय दिना पाटील यांनी व्यक्त केलेली आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संजय दिना पाटील यांचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय दिना पाटील यांना मानखुर्दमध्ये जास्त मतं मिळाली होती.