प्रस्तावित विमानतळासाठी उलवे नदीचा प्रवाह वळवला

नवी मुंबई: गेल्या आठवड्यात उलवे नदीचे पात्र वळविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळा नुकताच सुरू होत आहे. अशावेळी उलवे नदीचा प्रवाह वळवल्याने मोठा पाऊस झाल्यास पनवेल आणि विमानतळ परिसरातील ग्रामस्थांना पूराचा धोका निर्माण होवू शकतो.

विमानतळाच्या धावपट्टीला अडथळा ठरल्याने उलवे नदीचा 3.2 किलोमीटरचा प्रवाह वळवण्यात आला आहे. नदीचा प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणात वळवण्याची राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलीच वेळ असावी. पनवेल, खारघर, बेलापूर आणि उलवे यामधील अनेक गावे विमानतळ परिसरात येतात. यंदाच्या पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यावर विमानतळ परिसरातील ग्रामस्थांना पूराचा किती धोका आहे हे स्पष्ट होईल.