सोशिअल मीडियाचं डाऊनलोड बंद.

काल पासून सोशिअल मीडियाच डाउनलोड बंद असल्याचं दिसून येत आहे. आज सकाळी पूर्वपदावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Facebook, WhatsApp आणि Instagram जगभरात डाऊन झालं होतं. व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचं अनेकांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या आहेत. तसेच भारतातले युजर्सही प्रभावित झाले आहेत. युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या देशांत Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे येत आहेत. मलेशिया, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही युजर्सना फेसबुक आणि  WhatsApp वापरण्यात अडथळे येत आहेत. तिन्ही प्लॅटफॉर्मवर लोकांना अडचणी येत असल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

दरम्यान आज सकाळपासून पुन्हा एकदा या तिन्हींची डाउनलोड सेवा सुरू झाली असल्याचे फेसबुक मार्फत सांगण्यात आले आहे.