India Vs England: पहिल्या त20 सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की

भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इयन मॉर्गनच्या इंग्लंड (England) संघाने अष्टपैलू कामगिरी करत 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली इंग्लंडकडून जेसन रॉय (Jason Roy) आणि जोस बटलरच्या (Jos Buttler) जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली.

रॉयने सर्वाधिक 49 धावा केल्या तर बटलरने 28 धावा केल्या. अखेरीस जॉनी बेअरस्टो 26 आणि डेविड मलान 24 धावा करून नाबाद परतले. भारतासाठी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.  टॉस गमवून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघासाठी श्रेयसने 48 चेंडूत 67 धावांची मोठी खेळी केली तर रिषभ पंत 21 धावा आणि हार्दिक पांड्याने 19 धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली.

इंग्लंडचे सलामीवीर रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावा फटकावल्या व यजमान संघाकडून सामना खेचून आणला. रॉयचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले बटलर, डेविड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांनी अनुक्रमे 28, 24 आणि 26 धावांचे योगदान दिले.

इंग्लंडकडून (England) अवघड खेळपट्टीवर सलामीच्या टी-20 सामन्यात पराभव पत्करलेल्या यजमान टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने ((Virat Kohli) सामन्यात उद्भवलेल्या आव्हानाला तोंड द्यायला आपण तयार नसल्याचं कबुल केलं.

“या प्रकारच्या खेळपट्टीवर आपल्याला काय करावे लागेल याबद्दल आम्हाला पुरेसे माहिती नव्हती. मला वाटते की आमच्या शॉट्सवर अंमलबजावणीचा अभाव आणि आम्हाला काहीतरी गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे,” सामन्यानंतर विराट म्हणाला.