Career Guidance: Ethical Hacking & Cyber Security.

एथिकल हॅकिंग- संगणकाबाबतच्या संभाव्य धोक्यांपासून सावधगिरी बाळगण्यापासून माहिती सुरक्षित राखण्यापर्यंतचे कार्य करणाऱ्या तज्ज्ञांना एथिकल हॅकर्स म्हणून संबोधले जाते. संस्थेच्या माहिती साठय़ाचे संरक्षण करणे, माहिती प्रक्रियेतील कच्च्या दुव्यांचा शोध घेणे, त्यावर उपाय सुचवणे इत्यादी बाबी या तज्ज्ञांना कराव्या लागतात.

बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, अनेक शासकीय संस्था यांना अशा एथिकल हॅकर्सची गरज भासते. या क्षेत्रातील तंत्रज्ञ, सुरक्षा संशोधक, माहिती सुरक्षा सल्लागार, माहिती सुरक्षा विश्लेषक, सायबर सुरक्षा व्यावसायिक, नेटवर्क सुरक्षा अभियंते, डिजिटल फोरेन्सिक अ‍ॅनॅलिसिस म्हणून बँकिंग, आयटी, ई-कॉमर्स आणि समाजमाध्यमे यामध्ये काम करू शकतात.