खारघर मधलं पांडव कडा धबधब्याच्या ओढा फुटला; ओढ्याच पाणी सायन- पनवेल महामार्गावर

नवी मुंबई: सकाळपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्याच्या ओढा फुटला. ओढाच्या पाण्याचा प्रवाह यामुळे सायन- पनवेल महामार्गावर आले.

वरून धो धो कोसळणारा पाऊस आणि फुटलेल्या धबधब्याचे पाणी यामुळे सायन पनवेल महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही गाड्या अक्षरशः पाण्यावर तरंगताना दिसत होत्या. दरम्यान दुपारनंतर पाऊस कमी होऊन, पावसाने काही काळ विश्रांती घेतली आणि म्हणूनच रस्त्यावरचे पाणी ओसरायला मदत झाली.

यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.