
पुण्याच्या (Pune) गहुंजे स्टेडियमवर खेळण्यात आले पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या (Indian Team) भेदक माऱ्यापुढे इंग्लंड (England) संघाने गुडघे टेकले ज्यामुळे संघाला धावांनी 66 पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 318 धावांच्या विशाल लक्ष्याच्या प्रत्युत्तरात संघ 251 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक 94 धावांची खेळी केली तर जेसन रॉयने (Jason Roy) 46 धावा, मोईन अलीने 30 आणि कर्णधार इयन मॉर्गनने 22 धावांचे योगदान दिले. शिवाय, तिसऱ्या स्थानावर बढती मिळालेला बेन स्टोक्स पराभव पाडण्यात अपयशी ठरला आणि एक धावच करू शकला.
दुसरीकडे, भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाजांनी पुढाकार घेत इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवले. प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) 4, शार्दूल ठाकूरने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 आणि कृणाल पांड्याला 1 विकेट मिळाली.










