पोलीस दलातील ( Mumbai Police Force) तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर या पदावर हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार घेताच हेमंत नागराळे यांनी मुंबई पोलीस दलात फेरबदल करणार असल्याचे संकेत दिले होते.

मुंबई पोलीस दलातील ( Mumbai Police Force) तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Mumbai Police Transfer) करण्यात आल्या आहेत. 

एकाच वेळी तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी मुंबई गुन्हे शाखेतील 65 अधिकाऱ्यांना इतरत्र हालवले आहे. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या बदल्यांकडे पाहिले जात आहे. 

ज्या अधिकाऱ्यांनी मुंबई गुन्हे शाकेत अधिक काळ काढला आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हा बदल्या नियमीतपणे होणाऱ्या प्रशासकीय बदल्या असल्याचे सांगितले जात असले तरी, याला सचिन वाझे प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचेच बोलले जात आहे.