
दुर्मिळ आजारांनी (Rare Diseases) झटत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. राष्ट्रीय दुर्मिळ आजार धोरण 2021 ला (National Rare Disease Policy 2021) सरकारने मान्यता दिली आहे.
दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी राष्ट्रीय आरोग्य निधी (Rastriya Arogya Nidhi) च्या छत्र योजनेअंतर्गत सरकार 20 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देईल.
हे धोरण फक्त बीपीएल कुटुंबांपुरते मर्यादित राहणार नाही तर पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) लाभार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे.
दुर्मिळ आजार रोखणे, उपचार करणे आणि व्यवस्थापनामध्ये अनेक आव्हाने असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
प्राथमिक देखभाल चिकित्सक, पुरेशी तपासणी आणि उपचारांच्या सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे दुर्मिळ आजाराचे लवकर निदान करणे हे एक मोठे आव्हान आहे. दुर्मिळ रोग आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी औषधांची उपलब्धता आणि प्रवेश देखील महत्त्वपूर्ण आहे.
दुर्मिळ रोगांच्या प्रभावी आणि सुरक्षित उपचारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. दुर्मिळ रोगांच्या उपचारांची किंमत खूप जास्त आहे.
धोरणात आरोग्य सुविधांद्वारे दुर्मिळ आजारांपासून बचाव व उपचारासाठी आरोग्य सेवा सुविधा बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सीओई निदान सुविधांच्या सुधारणांसाठी 5 कोटी रुपयांपर्यंतची एक-वेळची आर्थिक मदतही देईल.











