IPL 2021: चेन्नईच सुपर किंग, पंजाब किंगवर दणदणीत विजय; दिपक चहरची चमकदार कामगिरी

पंजाब विरोधात (Punjab Kings) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल (IPL) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) 6 विकेटने एकतर्फी विजय मिळवला आणि स्पर्धेत दोन सामन्यातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.

पंजाब संघाने यापूर्वी पहिले फलंदाजी करत 106 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून लक्ष्य पूर्ती केली.

सुपर किंग्सकडून मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 46 धावा केल्या तर फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) 36 धावा आणि सॅम कुरन 5 धावा करून नाबाद परतले. याशिवाय सलामी फलंदाज रुतुराज गायकवाड 5 धावाच करू शकला.

पंजाब किंग्ससाठी मोहम्मद शमीला (Mohammed Shami) 2 तर मुरुगन अश्विन आणि अर्शदीप सिंह यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे. दरम्यान, पंजाब किंग्सचा आयपीएल 14 मधील हा पहिला पराभव ठरला आहे. यापूर्वी संघाकडून शाहरुख खानने 47 धावांची निर्णायक खेळी केली होती.

यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स विरोधात चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 4 विकेट्स घेत संघाला मोठाही धावसंख्या करण्यापासून रोखले. यासह चाहरने आयपीएलमध्ये आपल्या सर्वोत्तम गोलंदाजी रेकॉर्डची नोंदही केली.

दुसरीकडे, भारताचा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार एमएस धोनीनेवानखेडेवर आणखी एक विक्रम केला आहे. आयपीएल इतिहासात एका चेन्नई सुपर किंग्सकडून 200 सामना खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे.