पंतप्रधानपदासाठी एनडीएकडून नरेंद्र मोदींची निवड, सत्ता स्थापनेसाठी आज रात्रीच करणार दावा.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत भाजपाप्रणीत एनडीएने 353 जागा जिंकून आज एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी मोदी यांची निवड केली. याप्रसंगी मोदी यांनी ज्येष्ट नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे आशिर्वाद घेतले. एनडीएच्या सर्व घटक पक्षांना व विजयी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख़ उध्दव ठाकरे यांनीही मोदी यांना पुष्पगुच्छ देवून मोदी यांची गळाभेट घेतली. एनडीएच्या बैठकीमध्ये नेतेपदी नरेंद्र मोदी यांचा नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तो सर्वानुमते मान्य करून एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी मोदी यांची निवड करण्यात आली. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी आज रात्रीच नरेंद्र मोदी दावा करणार असल्याचे ख़ात्रीशिर सुत्रांकडून सांगण्यात आले.

याप्रसंगी संविधानाला नमन करून भाषण करताना मोदी यांनी सर्वांचे आभार मानले. 2019ची निवडणूक ही सामाजिक समतेचे प्रतिक. देशातील जनतेने नव्या युगाची सुरुवात केली आहे. भारतीय लोकशाही प्रलग्भ होत आहे. सत्तेचा हव्यास जनतेने फेटाळून लावला. पाच वर्षात एनडीएने एकदीलाने काम केले. पाच वर्ष जनतेने सरकार चालवल. सरकार आणि जनता यांच्यात एक विश्वासाच नातं तयार झाल आहे. पुढील पाच वर्ष कोणताही भेदभाव न करता सरकार काम करणार आहे. नवी ऊर्जा घेवून सर्व मिळून काम करू. स्वातंत्रनंतर पहिल्यांदाच एवढ्याप्रमाणात महिला संसदेत असणार आहेत. सरकारच्या पाठीशी मातृशक्तीची ताकत आहे. एनडीए गठबंधनाचे दोन वैशिष्ट्यै आहेत एक एनर्जी आणि दुसरे सिनर्जी. वाजपयींचे संस्कार आम्हाला शिकवण देतात, लोकप्रतिनीधींनी जपून बोलायला हवे. प्रत्येक मुद्याची योग्य माहिती घ्या आणि मगच बोला, असा सल्ला ख़ासदारांना दिला. जवळ्पास तासाभराच्या भाषणात मोदींनी अनेक मुद्याना हात घातला आणि भविष्यात सरकारची वाटचाल कशी असेल स्वप्नातील भारत कसा  असेल याची ग्वाही दिली. तसेच नवीन खासदारांना अनेक गोष्टींचा कानमंत्र दिला. नवीन खासदारांनी काय करावे काय करु नये याबाबत शिकवणी दिली. शपथ विधी होइपर्यंत कोणत्याही बातम्यावर विश्वास ठेवू नये असेही सांगितले. जनसेवा प्रभूसेवा हा मंत्र घेवून काम करावे. 2014 ते 2019 आम्ही गरीबांसाठी सरकार चालविले आणि 2019 च सरकार गरीबांनी बनविले आहे. गरीब जनतेच्या हक्कासाठी हे सरकार काम करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल यांचा वारसा लाभलेल्या या संविधनाला स्मरूण हे सरकार गरीब, पिडीत लोक, सर्व जाती, पंत  यांना सामावून घेवून काम करणार आहे.