
सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्यामध्ये आयपीएलचा 20वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर नुकताच समपुष्टात आला.
सामन्यात दिल्लीने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादने केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धावसंख्याची बरोबरी केली त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली गेली.
यामध्ये सनरायझर्सने 8 धावांचे लक्ष्य दिले ज्याच्या प्रत्युत्तरात अखेर दिल्लीने बाजी मारली. विल्यमसन 66 धावा करून नाबाद परतला. याशिवाय, जॉनी बेयरस्टोने 38 धावांचे योगदान दिले. कर्णधार डेविड वॉर्नर आजच्या सामन्यात देखील फ्लॉप ठरला आणि अवघ्या 6 धावाच करू शकला.
जगदीशा सूचितने विल्यमसन सोबत अखेरच्या ओव्हरमध्ये संघाला दिल्लीच्या धावसंख्येची बरोबरी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सूचितने नाबाद 14 धावा केल्या. दिल्लीकडून आवेश खानने 3 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेलने 2 आणि अमित मिश्राला 1 विकेट काढली.
आयपीएल 14च्या तिसऱ्या ‘सुपर संडे’नंतर इंडियन प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे.
दिवसाच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आणि पॉईंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक मिळवला तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिला पराभवामुळे तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. याशिवाय, दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद विरोधात सुपर ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सचे चौथे स्थान कायम असून सनरायझर्स हैदराबाद देखील 2 गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.











