
वेलिंग्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. तिसऱ्या टी-२० सारखाच चौथा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १३ धावा केल्या. विजयाचे लक्ष्य भारताने ५व्या चेंडूवर पार केले. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते. टिम सेइफर्टने ५७ धावा करत न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहोचवलो. २०व्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावा हव्या होत्या. पण भारताच्या शार्दुल ठाकूरने कमाल केली. त्याने अखेरच्या षटकात दोन विकेट घेतल्या आणि फक्त ६ धावा दिल्या त्यामुळे दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या.











