पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने कोकणाला मिळाले 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मिळाले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटरर्सचे रत्नागिरी जिल्ह्यासाठी वाटप करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि.प.उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर,उपजिल्हाप्रमुख संजय साळवी व इतर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या 50 वायल उपल्बध करून दिल्या.त्या सर्व वायल जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या.

स्थानिक विकास निधीतून कोविड 19 बाबतच्या उपचार सुविधा वाढविण्यात येणार असून यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतील 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यायाबाबत त्यांनी एका बैठकीत माहिती दिली.

हा निधी ग्रामीण रूग्णालय पाली आणि संगमेश्वर,मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र,रत्नागिरी नगरपरिषदेचे कोविड केअर सेंटर आणि मास्क वाटपासाठी खर्च करण्यात येणार आहे.