
अमेरिका (USA) सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे ते नागरिक मास्क न घालता घराबाहेर पडू शकतात. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना मास्क (Mask) लावण्याची मुळीच आवश्यकता नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (Centers for Disease Control and Prevention) विभागाने ही घोषणा केली आहे.
सीडीसी (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहेत ते मास्क न लावता घराबाहेर पडू शकतात. सार्वजनिक आणि खासगी ठिकाणीही फिरू शकतात. तसेच या लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळण्याचीही गरज नाही.
सीडीसी निर्देशक रोशेल वॉलेंस्की यांनी व्हाईट हाऊसला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ज्या लोकांनी कोरोना व्हायरस लसीकरण पूर्ण केले आहे. म्हणजेच ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे लोक मास्क न लावता घराबाहेर पडू शकतात. शिवाय त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचीही आवश्यकता नाही. हे लोक एकत्र येऊ शकतात आपले जीवन पूर्वीप्रमाणे साजरे करु शकतात.











