
लोकसभा निवडणूक 2019 – सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यावेळी लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार असून, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अशी लढत रंगणार आहे.











