
अहमदनगर मतदारसंघातून आमदार संग्राम अरुण जगताप, तर माढ्यातून आ. बबन शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देऊन अनुक्रमे सुजय विखे व रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. अमरावतीतून नवनीतकौर राणा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीनेसहमती दर्शवल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनीही पवारांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली. अनिल गोटे-शरद पवार भेट तब्बल २६ वर्षानंतर आ. अनिल गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तेलगी प्रकरणानंतर गोटे पवारांपासून दुरावले होते. कोणत्याही परिस्थितीत मला केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभूत करायचे आहे म्हणून मी पवारांची भेट घेतली, असे नंतर गोटे यांनी सांगितले. भामरेंच्या विरोधात स्वत: गोटे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.











