
नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे.
तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शायकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावं, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मात्र कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू असा इशारा नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांचा खाजगी डॉक्टर्सला दिला आहे.
हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशनचा निर्णय ऐकतर्फी आणि चुकीचा आहे. सर्व हॉस्पिटलला महानगरपालिका परवाना देत असते. सेवा देणं हे प्रत्येकाच कर्तव्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देण्याअगोदर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्याकडे समस्या न मांडता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आज खाजगी डॉक्टरशी चर्चा करणार तोडगा निघाला नाहीतर कारवाई करणार येईल असेही त्यांनी सांगितले.






