
साऊथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर संपुष्टात आला आहे.
तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या (Team India) पहिल्या डावातील 217 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाने 49 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत आणि भारताकडे अद्याप 116 धावांची आघाडी आहे. किवी संघाने टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेच्या (Devon Conway) रूपात दोन विकेट गमावल्या. लाथमने 30 धावा केल्या तसेच कॉनवेने अर्धशतक पूर्ण केले व 54 धावा केल्या. तसेच कर्णधार न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 12 धावा करून मैदानात टिकून होता. विल्यमसनला साथ देण्यासाठी रॉस टेलर देखील मैदानात उतरला होता. दुसरीकडे, भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. जेमीसनने कर्णधार विराटसह रिषभ पंत (Rishabh Pant) आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) अडथळा दूर केला. तसेच त्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांना एकात ओव्हरमध्ये माघारी धाडलं. जेमीसनने एकाच डावात भारताचे 5 गडी बाद केल्यामुळे भारताचा डाव फक्त 217 धावांवर संपुष्टात आणला.
भारतीय संघाकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या तर विराटने 44 आणि रोहित शर्माने 34 धावांचे छोटेखानी योगदान दिले. किवी संघाने अंतिम-11 मध्ये फिरकीपटूचा समावेश केलेला नाही आहे तर भारतीय इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा व अश्विन असे दोन आघाडीचे स्पिन गोलंदाज आहेत.











