
कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 44 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 धावा करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट-रहाणेने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. भारतीय संघाने (Indian Team) 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली आहे.
पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) फायनल सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलने डावाची सुरुवात केली. रोहितने 34 आणि शुभमनने 28 धावा केल्या. दुसरीकडे, किवी गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत भारतीय फलंदाजांना अडचणीत पाडले. टिम साउदी, नील वाग्नर, ट्रेंट बोल्ट आणि काईल जेमीसन यांनी पहिल्या दिवशी प्रत्येकी 1 विकेट काढली.
भारताकडून शुभमन आणि रोहितच्या जोडीने चांगली सुरुवात करुन दिली मात्र दोघेही काही वेळातच बाद झाले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी झाली पण दोन्ही सलामी फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करू शकले नाही.
अंधुक प्रकाशामुळे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थगित करण्यात आला आहे.











