Corona Update: दिलासादायक ! महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

राज्यातील कोरोना व्हायरस (Covid 19) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज (शुक्रवार, 25 जुन) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज 9,677 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. तर 10,138 जण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 156 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले.

ही आकडेवारी पाठिमागील 24 तासांमधील आहे. संपूर्ण आकडेवारीवर नजर टाकता गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे.

तसेच, कोरोना संक्रमितांपेक्षाही उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. मुंबई शहरातही कोविड संक्रमितांची आणि मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत आहे. मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या आकडेवारीवरुन हे वास्तव पुढे येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासोबतच राजधानी मुंबई शहरातूनही दिलासादायक वृत्त आहे. मुंबई शहरातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटताना पाहायला मिळते आहे. मुंबईत आज दिवसभरात 693 जण कोरोना संक्रमीत झाले. 575 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंईत सध्यास्थितीत 10437 जणांवार उपचार सुरु असल्याची माहती मुंबई महापालिकेने दिली आहे.

Delta Plus कोरोना व्हायरस (Coronavirus) व्हेरीएंट राज्य आणि देशासमोर चिंता वाढवण्यीच शक्यता असतानाच सदर आकडेवारी दिलासादायक म्हणावी लागेल.