मेगा भरती भाग तीन: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कोसळली; गणेश नाईक यांचा 48 नागरसेवकांसह मुख्यमंत्रयांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

माजी खासदार संजीव नाईक हे सुध्दा भाजपवासी

नवी मुंबई: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजय नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ठाणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गणेश नाईक यांनी आज पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि 48 नागरसेवकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. वाशी येथील सिडको प्रदर्शन सभागृहात झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आज खऱ्या अर्थाने भाजपाची मेगा भरती भाग तीन म्हणायला हवा कारण हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ गणेश नाईक यांचाही प्रवेश झाला आहे.

परंतु नाईक यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. युतीमध्येही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बेलापूर मतदार संघातही उमेदवारीचा गुंता वाढणार आहे.